Fact Check : ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्त्याच्या निधनाचे व्हायरल छायाचित्र; काय आहे सत्यता?

121
Fact Check : ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्त्याच्या निधनाचे व्हायरल छायाचित्र; काय आहे सत्यता?
Fact Check : ज्ञानवापी प्रकरणातील याचिकाकर्त्याच्या निधनाचे व्हायरल छायाचित्र; काय आहे सत्यता?

Claim Review : समाजमाध्यमांतील पोस्टवर ज्ञानवापी मशिदीसंदर्भात याचिका दाखल करणारे हरिहर पांडे यांचे निधन झाल्याचा दावा केला गेला आहे.
Claimed By : सोशल मीडिया युजर्स
Fact Check : दिशाभूल

Created By : पीटीआय
Translate By : हिंदुस्थान पोस्ट मराठी

समाजमाध्यमांवर एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे. त्यात असे म्हटले आहे की, ज्ञानवापी मशिदीसंदर्भात (Gyanvapi Mosque) याचिका दाखल करणारे हरिहर पांडे (Harihar Pandey) यांचे निधन झाले आहे. मात्र पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, हरिहर पांडे यांचे निधन वयाच्या ७७ व्या वर्षी २०२३ मध्ये झाले होते. तसेच व्हायरल छायाचित्र दुसऱ्यात व्यक्तीचे आहे.

व्हायरल छायाचित्रातील नेमका दावा काय?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील ट्विटरवर अमिता नावाच्या एका युजर्सने दि. ४ डिसेंबर रोजी एक छायाचित्र व्हायरल केले होते. त्यात लिहले होते की, या व्यक्तीला ओळखले का? ही व्यक्ती आहे, ज्ञानवापी मशिदीची (Gyanvapi Mosque)  याचिका दाखल करणारे हरिहर पांडे. हरिहर पांडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याआधीच निधन झाले. ही घटना खुपच दुख:द आहे. तरी त्यांच्या पश्चात परिवाराला धैर्य मिळो. ज्ञानवापी प्रकरणी याचिका दाखल करणारे हरिहर पांडे यांचे दि. १ डिसेंबर रोजी बीएचयूमध्ये सकाळी निधन झाले. याआध तीन याचिकाकर्त्यांमधील दोन याचिकाकर्ते सोमनाश व्यास आणि रामनारायण शर्मा यांचे निधन झाले होते, असे युजर्सने पोस्टमध्ये लिहले होते.

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्राची सत्यता जाणून घेण्यासाठी डेस्कने सर्वप्रथम छायाचित्राला काळजीपूर्वक पाहिले. त्यामध्ये पोस्टच्या कमेंटमध्ये काही युजर्सने या पोस्टला फेक असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर यामध्ये तथ्य नसल्याचे लक्षात आले. त्यादरम्यान Google वर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला Facebook वर राजा आनंद ज्योती सिंग नावाचे पेज सापडले. हे त्याच व्यक्तीचे पेज होते, ज्यांचा फोटो सोशल मीडियावर हरिहर पांडे (Harihar Pandey) म्हणून शेअर केला जात आहे. त्याचवेळी, काही वापरकर्ते हे व्हायरल छायाचित्र दि. १ डिसेंबरपासून राजा आनंद ज्योती सिंह यांच्या निधनाशी जोडून शेअर करत आहेत. (Gyanvapi Mosque)

दरम्यान पीटीआयने सांगितले की, हरिहर पांडेंबद्दल माहिती मिळवण्यासाठी आम्ही संबंधित कीवर्डद्वारे शोध घेतला. त्यावेळी आज तकच्या वेब पोर्टलवर दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी सापडली. या बातमीनुसार, ज्ञानवापी प्रकरणातील हिंदू पक्षाच्या वतीने याचिका दाखल करणारे हरिहर पांडे (Harihar Pandey) यांचे दि.११ डिसेंबर २०२३ रोजी दीर्घ आजारानंतर वाराणसी येथील रुग्णालयात निधन झाले.

(सदर फॅक्ट चेक PTI https://bhasha.ptinews.com/fact-detail/2046928 या वेबसाईटने प्रसिद्ध केलं आहे. ‘ शक्ती कलेक्टिव्ह’चा भाग म्हणून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने त्याचा अनुवाद केला आहे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.