ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी Anil Deshmukh यांच्यावर फडणवीसांचा दबाव; Shyam Manav यांचे गंभीर आरोप

307
ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी Anil Deshmukh यांच्यावर फडणवीसांचा दबाव; Shyam Manav यांचे गंभीर आरोप
ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी Anil Deshmukh यांच्यावर फडणवीसांचा दबाव; Shyam Manav यांचे गंभीर आरोप

गुटखा व्यापाऱ्यांवर कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दबाव होता, असा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी २४ जुलै रोजी नागपुरात केला आहे.

(हेही वाचा – Pooja Khedkar ला खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत; महापालिकेचे चौकशीचे आदेश)

…त्यामुळेच अनिल देशमुख यांना 13 महिने तुरुंगात रहावे लागले

अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब या तिघांचं नाव घेण्यास नकार दिला. त्यामुळेच अनिल देशमुख यांना 13 महिने तुरुंगात रहावे लागले, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे. संजय राऊत यांनाही अशाच पद्धतीनं खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावाही श्याम मानव यांनी केला आहे.

…यांची नावं घेण्याची ऑफर

या वेळी आरोप करतांना श्याम मानव म्हणाले की, अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचं वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या, असं सांगण्यासाठी अनिल देशमुखांवर काही लोकांकडून सातत्यानं दबाव टाकला जात होता. तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावं विविध खोट्या प्रकरणात घेतली, तर तुम्हाला ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ, अशी थेट ऑफर अनिल देशमुखांना देण्यात आली होती.

अनिल देशमुख गृहमंत्री असतांना काही लोकांकडून सांगण्यात आले होते की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल, तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे नाव घ्या. आदित्य ठाकरे यांचे नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावे, अनिल परब यांचेही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावं. मात्र, अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही, असे आरोप श्याम मानव यांनी केले आहेत.

या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.