- विशेष प्रतिनिधी, मुंबई
पूर्व उपनगरातील टोक मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पासून मुलुंड पर्यंतच्या भागांत अनेक ठिकाणी मलवाहिनी (Manholes) जुन्या होऊन त्यांना गळती लागल्याने मल बाहेर वाहून जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या या परिमंडळ ६ मधील तब्बल ४३ ठिकाणी नव्याने मलवाहिनी टाकण्यात येणार आहे. याठिकाणी असलेल्या २२५ ते ३०० मि मी व्यासाच्या मलवाहिनी जुन्या जीर्ण झाल्या असून त्यातील त्यातील मल बाहेर वाहून दुर्गंधी पसरत असल्याने याठिकाणी नव्याने मलवाहिनी टाकल्या जाणार आहेत. तब्बल १२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी नव्याने टाकली जाणार आहे.
(हेही वाचा – Congress : खरगे यांच्यामुळे काँग्रेस अडचणीत येणार?)
सामान्यत: मलवाहिन्यांच्या दीर्घकालीन वापरानंतर या वाहिनींची झीज होते, तसेच त्यात गाळ आणि कचरा जमा झाल्याने आणि झाडांची मुळे आत येत असल्याने या मलवाहिनीला (Manholes) तडा पडणे, फुटणे असे प्रकार घडते. अनेकदा मलवाहिनीत कचरा व गाळ जमा झाल्याने मलाचा प्रवाह थांबतो आणि हा मल मॅनहोल्समधून बाहेर वाहू लागतो. परिणामी हा मल बाहेर वाहू लागल्याने याची दुर्गंधी पसरते आणि एकप्रकारे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा जुन्या जलवाहिनी बदलणे आणि खराब झालेल्या व गळती लागलेल्या मलवाहिनी बदलून त्याच्या जागी नवीन मलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेच्या मलनि:सारण प्रचालन विभागाच्यावतीने हाती घेतले जाते.
(हेही वाचा – Apple Job Cuts : ॲपलच्या सेवा विभागात शेकडो लोकांची गच्छंती?)
अशाचप्रकारे मुलुंड ते घाटकोपर परिसरात तब्बल ४३ ठिकाणी अशाप्रकारे मलवाहिनी जुन्या झाल्याने तसेच कचरा व गाळ जमा झाल्याने अंतर्गत भाग खराब झाल्याने त्यांच्या जागी नव्याने मलवाहिनी (Manholes) टाकण्याचे काम हाती घेतले जात आहे. तब्बल १२ किलो मीटर लांबीच्या या मलवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी विविध करांसह सुमारे ७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी व्हर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये ही कामे केली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community