Fake companies: देशात २.३३ लाख बनावट कंपन्या; सरकारच्या कारवाईतून आकडेवारी समोर

29

राज्यात दिवसेंदिवस बोगस आणि बनावट कंपन्यांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये कर वाचवण्यासाठी छुप्या पद्धतीने आणि गैरमार्गाने कंपन्या चालवणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहेत. दरम्यान, गेल्या पाच वर्षात रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (Registrar of Companies) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यातील ३६,८५६ कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. बोगस कंपन्यात महाराष्ट्र (Maharashtra Fake Company) देशात आघाडीवर आहे. त्यानंतर ३५,६३७ बनावट कंपन्यासह दिल्ली क्रमांकावर आहे. दुसऱ्या गत पाच वर्षात २,३३,५६६ कंपन्यांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये ५९,९९५ कंपन्यांना यादीतून काढून झाली. तर, २०२२-२३ मध्ये ८२,१२६ कंपन्यांना यादीतून काढून टाकण्यात आले. २०२३-२४ मध्ये यादीतून काढलेल्या कंपन्यांची संख्या १६,४६५ होती. विशेष म्हणजे, पाचपैकी चार वर्षांत महाराष्ट्र यात अव्वल राहिला, सततच्या धडक कारवाईमुळे या कंपन्या समोर आल्या आहेत. (Fake companies)

(हेही वाचा – Bangladeshi infiltrators : मुंबई पोलिसांची घुसखोर बांगलादेशींविरुद्धची मोहीम तीव्र, विविध ठिकाणांहून ६ घुसखोर बांगलादेशींना अटक)

अनेकदा कंपन्यांवर धडक कारवाई 

सरकार या कंपन्यांना बनावट कंपन्या (Fake companies) म्हणून संबोधत नाही. परंतु, त्यांना निष्क्रिय म्हणून वर्गीकृत करते. ज्यांनी कोणताही व्यवसाय केला नाही किंवा गेल्या दोन आर्थिक वर्षामध्ये आर्थिक विवरणे आणि वार्षिक रिटर्न (Annual Return) भरले नाहीत. वेळोवेळी अशा कंपन्यांवर धडक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.