नोटा तपासून घ्या! कारण…, संसदेत सरकारने नोटांबाबत दिली धक्कादायक माहिती

500 किंवा 2 हजारांची नोट घेताना ती नक्की खरी आहे की नाही याची नक्की खात्री करुन घ्या. कारण केंद्र सरकारने खोट्या नोटांबाबत संसदेत मोठी माहिती दिली आहे. 2018 ते 2020 या काळात जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार संसदेत ही माहिती देण्यात आली आहे.

2 हजार रुपयांच्या नोटांमध्ये वाढ

2016 ते 2020 या चार वर्षांच्या काळात जप्त करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वाढल्या आहेत. 2 हजार रुपयांच्या नोटा भारतीय चलनात आल्यानंतर 2016 मध्ये दोन हजार रुपयांच्या 2 हजार 272 खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या. त्यानंतर 2017 मध्ये ही संख्या तब्बल 74 हजार 898 इतकी झाली. त्यानंतर 2018 मध्ये 54 हजार 776, 2019 मध्ये 90 हजार 556 तर 2020 मध्ये 2 हजार रुपयांच्या तब्बल 2 लाख 44 हजार 834 खोट्या जप्त करण्यात आल्या आहेत. एनसीआरबीच्या आकडेवारीवरुन वित्त राज्यमंत्र्यांनी संसदेत ही माहिती दिली आहे.

(हेही वाचाः जेव्हा कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती डीएनए टेस्टची मागणी)

प्रमाण कमी करणार

बनावट नोटांचे प्रमाण रोखण्यासाठी हायक्वालिटी नेक इंडियन करन्सी नोट्सच्या तपासणीसाठी नोडल एजन्सी तयार करण्यात आली आहे. तसेच भारत आणि बांग्लादेश यांच्यात माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी आणि बनावट नोटांची तस्करी करणा-यांची ओळख पटवण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्स देखील तयार करण्यात आली असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here