परीक्षेचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल; Mumbai University कडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

73
Mumbai University : सोशल मीडियासह इतर माध्यमांवर पाच वर्षीय विधीच्या (बीएलएस/एलएलबी) १० व्या सत्राच्या परीक्षेबाबत एक बनावट वेळापत्रक (fake exam timetable) तयार करून फिरत असल्याची माहिती समोर येत आहे. या वेळापत्रकात आगामी परीक्षांच्या तारखांमध्ये फेरबदल दर्शविण्यात आले आहेत. (Mumbai University)

दरम्यान सोशल मीडियावर (Social media) वेळापत्रक बनावट असल्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावर विश्वास ठेवावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. तसेच बनावट वेळापत्रकाबाबत अधिक माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाला कळवावे, जेणेकरून या गैरप्रकाराला वेळीच थांबवता येईल, असेही डॉ. पूजा रौंदळे (Dr. Pooja Raundle) यांनी सांगितले.
१६ एप्रिल ते ५ मेदरम्यान परीक्षा
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे पाच वर्षीय विधि शाखेच्या (बीएलएस/एलएलबी) (fake exam time table law branch) १० व्या सत्राची परीक्षा ही बुधवार, १६ एप्रिल २०२५ ते सोमवार, ५ मे २०२५ या नियोजित कालावधीत घेतली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची खात्री करण्यासाठी कृपया अधिकृत माध्यमांचा वापर करा आणि समाज माध्यमांसह इतर माध्यमांवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.