एकीकडे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) अनेक कारनामे समोर येत असताना दुसरीकडे पुण्यात एका बनावट आयएएस अधिकारी महिलेचेही अनेक कारनामे उघड झाले आहेत. या महिलेने खासगी सावकारी सुरू केली असून व्याजाच्या नावाखाली अनेक महिलांची लुबाडणूक केल्याचे समोर आले आहे. तिच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेलाही तिने धमकी दिली आहे.
(हेही वाचा – Ganpati Special train: आरक्षणात घोळ की आणखी काही? पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघ्या १ मिनिटात फुल्ल)
रेणुका ईश्वर करनुरे (Renuka Ishwar Karanure) असे या बनावट आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. रेणुका ईश्वर करनुरे या महिलेने पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दरमहा दहा टक्क्याने पैसे उकळले आहेत. या प्रकरणी रेणुका करनुरेच्या विरोधात एका 31 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सावकारीतून मागितले जास्तीचे पैसे
या पीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने बनावट आयएस अधिकारी रेणुकाला आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये दिले. तरीही रेणुका हिने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी करत पिढीतील त्रास देत धमकवण्यास सुरुवात केली.
“मी आयएएस अधिकारी आहे, माझ्या नादाला लागू नको. तुला कामाला लावेन, माझे पैसे तू ताबडतोब दे” असं म्हणत धमकवण्यास सुरुवात केली. या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता बनावट आयएएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community