सावधान ! राज्यभरात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे बनावट इंजेक्शन्स

93

कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी स्वतःच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती अबाधित राखण्यासाठी तुम्ही इंजेक्शन्स घेत असाल तर सावधान! बाजारात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या बनावट इंजेक्शनपासून सतर्क राहा. अन्न व औषध विभागानं जळगावात टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या धडक कारवाईनं या काळ्या बाजाराची पोलखोल झालीय.

माणसाच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्‍या इंजेक्शनची निर्मिती करणार्‍या मूळ कंपनी मालकांनीच उघडकीस आणला. ग्लोबूसल असं या इंजेक्शनचं नाव असून मूळ कंपनी मेसर्स इंटास फार्माक्युटीकल्सनेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. कंपनीच्या नावे बनावट माल बाजारात येत असल्याची तक्रार करण्यात आली. प्रकरणाची माहिती घेतली असता अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागाला जळगाव येथील बनावट साठ्याची माहिती मिळाली.

(हेही वाचा १७ वर्षांनी कल्पवृक्षाच्या ठेवीदारांना आनंदाची बातमी)

कशी झाली कारवाई?

  • चाळीसगाव येथील घाटे संकुलातील मेसर्स जोगेश्वरी फार्मावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी आणि स्थानिक पोलिसांनी छापा टाकला.
  • जळगाव पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनानं तिथल्या जोगेश्वरी फार्माचे मालिक जितेंद्र खोडके, तसेच पंजाबमधील श्रीक्रिधा इंटरनॅशनल हेल्थकेयरचे मालक सुनील ढालच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

कारवाईत काय आढळलं?

  • चंडीगडमधून मुंबईसह राज्यभरात हे इंजेक्शन राज्यभरात दिले जाताहेत.
  • मूळ ग्लोबूसल इंजेक्शनच्या २०० बनावट वायल्स साठ्यासह इतरही बनावट औषधे आढळली.
  • ज्या औषधविक्रेत्यांकडे औषध विक्रेत्याचा परवाना नाहीय, त्यांनाच हा बनावट साठा विकला जायचा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.