प्रत्यक्ष देवाच्या समोरच आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे. (Shirdi) शिर्डी येथील साई संस्थानच्या देणगी कक्षात देणगीदारांनी दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन साई संस्थान आणि देणगीदारांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भ्रष्ट कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देणगी कक्षात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केला आहे. या फसवणुकीच्या प्रकरणी साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या तक्रारीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shirdi)
(हेही वाचा – Afghanistan : अफगाणिस्तानचा भारतातील दूतावास बंद; सांगितली ‘ही’ कारणे)
काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात ‘देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना दिलेल्या रकमेच्या दोन भागातील पावत्या देत आहे आणि त्यातील एक पावती बनावट असते. संस्थानकडे या रकमेची नोंद होत नाही. त्या रकमेचा अपहार केला जातो’, असे नमूद केले होते. निनावी पत्र मिळाल्यानंतर साईबाबा संस्थानने याबाबत चौकशी केली असता या प्रकरणात तथ्य असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Shirdi)
आरोपी कर्मचारी चासकर याने आतापर्यंत किती लोकांना बनावट पावत्या दिल्या, तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत. शिर्डी येथील साई संस्थानचे सरकारीकरण झाले असून येथे सरकरनियुक्त कर्मचारी काम करतात. (Shirdi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community