मृत महिलेच्या नावावर बनावट भाडे करार करून 70 बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) पासपोर्ट मिळवून देण्याच्या मोठा पासपोर्ट घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यात येरवड्यातील यशवंत नगर वस्तीत हा पासपोर्ट घोटाळा झाला असून तेथील एका मृत महिलेच्या नावावर बनावट भाडे करार करून सहा बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) आखाती देशात जाण्यासाठी पासपोर्ट मिळवून देण्याचा गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. पण या कारवाईपूर्वी 70 बांगलादेशी घुसखोर बनावट पासपोर्ट आधारे आखाती देशात नोकरीवर पोहोचल्याचे धक्कादायक बाब पोलीस तपासणीत निष्पन्न झाली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 10 पासपोर्ट जप्त करण्यात आले असून एकूण जणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात एकूण 20 बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi infiltrators) आणि पुण्यातील 2 भारतीय एजंट बोरिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडून 10 भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले. हे सर्व पासपोर्ट खोटे भाडे करारनामे जोडून पुण्यातून मिळवले असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पासपोर्ट पुण्यातील ज्या पत्त्यावर मिळवले, तेथे हे बांगलादेशी कधीच राहात नव्हते. काही बांगलादेशी मुंबईत वास्तव्यास असूनही पुण्याचे रहिवाशी आहोत दाखविण्यासाठी एजंट मार्फत खोटे भाडे करारनामे तयार केले होते.
Join Our WhatsApp Community