सामाजिक माध्यमांवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या घराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Pantpradhan Nivas) अलिशान घर दाखवण्यात आले आहे. हे एक अलिशान घर असल्याचे सांगून येथील सर्व वस्तू उंची असल्यामुळेच सामान्य माणसाला ते दाखवले जात नाही, असा दावा करण्यात आला आहे. या घरातील दारा-खिडक्यांना लावलेल्या पदड्यांपासून बाथरुम सीट ते बेडपर्यंत प्रत्येकाची किंमत देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) अधिकृत एक्स खात्यावरून हा व्हिडिओ प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ प्रसारित करतांना पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. राजमहल असा उल्लेख केला आहे. तसेच अनेक आप नेते हा व्हिडिओ प्रसारित करत आहेत.
Big Breaking 🚨🔥
राजमहल का Video पहली बार आया जनता के सामने‼️😳
क्या इसलिए ही राजमहल के दरवाज़े जनता के लिए नहीं खोले जाते? pic.twitter.com/P52Ph2ak9n
— AAP (@AamAadmiParty) January 27, 2025
(हेही वाचा – मुंबईत लवकरच वॉटर टॅक्सी, वॉटर मेट्रो धावणार ? Transport Minister Pratap Sarnaik काय म्हणाले ?)
डॉ. शीतल मदन, पंकज मदन, महेश या अकांऊंटवरूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इतर युजर्स देखील त्याच आरोपांसह तोच व्हिडिओ शेअर करत आहेत. InVid या व्हिडिओ व्हेरिफिकेशन टूलमध्ये हा व्हिडिओ अपलोड केला असता, त्याच्या काही फ्रेममध्ये ओपन एआय लोगो होता. व्हिडिओ खूपच स्पष्ट आणि स्मूथ दिसत आहे. त्यामुळे तो एआय जनरेटेड व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे.
शीशमहल का सच बाहर आने के बाद से केजरीवाल गैंग बुरी तरह से बौखला उठी है आपियो को समझ आ गया है इस बार जनता झाड़ू लेकर ही आपियो के पीछे घूम रही है
— अजय प्रताप सिंह (Ajay) (@iAjaySengar) January 27, 2025
या एक्स पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान निवास (PM Narendra Modi) असे काही नाही, असे एकाने म्हटले आहे. तर एका पोस्टमध्ये केजरीवाल यांच्या शिशमहलचे (Sheesh Mahal) सत्य बाहेर आल्याने ते अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून व्हायरल करत आहेत, असे म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community