कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाने जगातील शेकडो लोकांचा जीव घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणा-या लोकांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून सरकारने 50 हजारांची मदत जाहीर केली. आता हीच मदत मिळवण्यासाठी अनेकांनी खोटे दावे भरले आहेत. आता या खोट्या दाव्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर लवकरच अॅक्शन घेणार आहे.
न्यायालयाचे चौकशीचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणा-यांना दणका दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये दाखल केलेल्या दाव्यांपैकी 5 टक्के दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तर 90 दिवसांत करा दावा
आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णायानुसार, 28 मार्चपर्यंत दावा करण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, भविष्यात जर भरपाई मिळवायची असेल, तर 90 दिवसांत दावा करावा असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
( हेही वाचा: हिजाब वादावर ‘सर्वोच्च’ दिलासा नाहीच! आता काय करणार हट्टाला पेटलेल्या विद्यार्थीनी? )
तफावत असल्याने चौकशीचे आदेश
या 4 राज्यांमध्ये 5 टक्के नुकसानभरपाईच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. कारण, दाव्यांची संख्या आणि नोंदवलेल्या मृत्यूंची संख्या यात तफावत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं, त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community