हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकात दाखवला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चुकीचा इतिहास, सावरकरप्रेमींमध्ये संताप

अहमदनगर येथे हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील एका नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्यामुळे नाट्यगृहात एकच गोंधळ उडाला. मी पण नथुराम गोडसेच बोलतोय या नाटकाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून विरोध करण्यात आला. या नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याची टीका करत प्रेक्षकांनी नाटकाचा प्रयोग थांबवला आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.

सावरकरांबाबत चुकीच्या इतिहासाचे सादरीकरण

अहमदनगरच्या माऊली नाट्यगृहात मंगळवारी 61व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत मी पण नथुराम गोडसेच बोलतोय या नाटकाचे सादरीकरण करण्यात येत होते. या नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत चुकीची माहिती देण्यात येत असल्याचे सांगत प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या सावरकरप्रेमींनी नाटकावर जोरदार आक्षेप घेतला आणि या नाटकाला तीव्र विरोध करत प्रयोग बंद पाडला. त्यामुळे नाट्यगृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

(हेही वाचाः ‘खटले न चालवता भर चौकात फासावर लटकवा’, श्रद्धा हत्याकांडाबाबत राऊतांची संतप्त प्रतिक्रिया)

सावरकरप्रेमींचा आक्षेप

स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येत होता. या नाटकात नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आक्षेप सावरकरप्रेमींनी घेतला आहे. तसेच नाटकातील इतरही प्रसंगांवरुन प्रेक्षकांनी आक्षेप घेत घोषणाबाजी करत नाटक बंद पाडले. याबाबत सावरकरप्रेमी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here