Bangladesh मधील हिंदू पत्रकाराच्या कुटुंबियांवर हल्ला

49
Bangladesh मधील हिंदू पत्रकाराच्या कुटुंबियांवर हल्ला
Bangladesh मधील हिंदू पत्रकाराच्या कुटुंबियांवर हल्ला

बांगलादेशातील फरीदपुरमध्ये अज्ञातांनी एका हिंदू (Hindu) कुटुंबियांनी हल्ला केला. पीडित पत्रकराच्या कुटुंबियांवर हा हल्ला करण्यात आला. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे. हल्ल्यात धारदार हत्यारांचा उपयोग करण्यात आला. ही घटना दि. ३ जानेवारी २०२५ रोजी घडली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Bangladesh)

(हेही वाचा : आश्चर्य! दिल्लीत आहे Japanese Park; इथे आल्यावर काय काय कराल?

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फरीदपुरच्या मधुखली गावात घडली. इथे स्वातंत्र्यसेनानी श्यामलेंदू बोस (Shyamalendu Bose) आपल्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांचा मुलगा सौगात बोस (Saugat Bose) एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करत होता. दि. ३ जानेवारी रोजी ८.३० वाजता श्यामलेंदू बोस यांचे कुटुंबीय टीव्ही पाहत होते. तेव्हा त्यांच्या घरात कोणीतरी घुसले आणि त्यानंतर ती अज्ञात व्यक्ती घराच्या दुसऱ्या माळ्यावर पळून जात होती. (Bangladesh)

बोस कुटुंबीयांनी अज्ञात घुसखोराचा पाठलाग केला असता, त्याने धारदार शस्त्र बाहेर काढले. हल्लेखोराने श्यामलेंदू आणि त्यांच्या पत्नीवरही हल्ला केला. दोघांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. हल्लेखोराने श्यामलेंदू आणि त्यांच्या पत्नीची काळजी घेणाऱ्या १५ वर्षीय प्रीतीलाही सोडले नाही. श्यामलेंदूच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील लोक
जमा झाले. संधी साधून हल्लेखोर शस्त्र उगारत पळून गेला.(Bangladesh)

सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पत्रकार सौगात बोस त्यावेळी घरी नाही. त्यांनी सांगितले की, आई-वडीलांसोबत प्रीतीही गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पत्रकार सौगात बोस यांची कोणाशीच वैर नाही. सौगात यांना अद्याप हेही माहिती नाही की हल्लेखोर एक होता की अन्य काही लोकही त्यांच्यासोबत होते. (Bangladesh)

दरम्यान पीडित दाम्पत्याच्या मुलाने ही घटना चोरी किंवा दरोड्यासाठी घडली नाही. त्यामुळे हल्ल्याचे कारण काहीतरी वेगळे आहे, असेही सौगात म्हणाला. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामलेंदू बोस (Shyamalendu Bose) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बऱ्याचप्रमाणात रक्त वाहिल्याने त्यांच्या मेंदूला जबर जखमी झाली आहे. श्यामलेंदू (Shyamalendu Bose) यांना चांगल्या उपचारासाठी ढाका येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उर्वरित दोन जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सुरुवातीला ही घटना दरोड्याचा प्रयत्न मानली आहे. त्यांच्या बाजूने हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुढील तपास व इतर आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.(Bangladesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.