चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे (Vilas Ujwane) यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं नाट्य, चित्रपट क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Vilas Ujwane)
हेही वाचा-काश्मीरच्या नंदनवनात साकारणार मराठी पुस्तकांचे गाव ; Uday Samant यांची माहिती
डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. या आजाराचा सामना करताना त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. त्यातच त्यांना कावीळची देखील लागण झाली होती. (Vilas Ujwane)
हेही वाचा- ऐरोलीमध्ये मँग्रोव्ह पार्कच्या उभारणीसाठी अभ्यास अहवाल तयार करा; वनमंत्री Ganesh Naik यांचे निर्देश
या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची मिळकत खर्च केली होती. आजारपणात त्यांच्याकडे कामंही नव्हतं. मात्र, या कठीण काळातून ते बाहेर पडले. मोठ्या धीराने त्यांनी या गंभीर आजाराशी लढा दिला आणि मनोरंजनविश्वात पुन्हा कमबॅक सुद्धा केलं होतं. ‘कुलस्वामिनी’, ‘२६ नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. (Vilas Ujwane)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community