Aurangzeb चे सोशल मीडिया पोस्टद्वारे लांगूलचालन करणाऱ्या धर्मांध सेल्समनला अटक

60
Aurangzeb चे सोशल मीडिया पोस्टद्वारे लांगूलचालन करणाऱ्या धर्मांध सेल्समनला अटक
Aurangzeb चे सोशल मीडिया पोस्टद्वारे लांगूलचालन करणाऱ्या धर्मांध सेल्समनला अटक

छत्रपती संभाजी महाराजांविरोधात (Chhatrapati Sambhaji Maharaj) आणि औरंगजेबाच्या (Aurangzeb) समर्थनार्थ निंदनीय पोस्ट करणाऱ्या अनस कुरेशी (Anas Qureshi) नामक सेल्समनला अटक करण्यात आली आहे. दि. २ मार्च रोजी आरोपी अनसविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. लालबाग-परळ (Lalbaug Parel) परिसरातील हिंदू तरुणांनी तातडीने हा प्रकार उघडकीस आणत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

( हेही वाचा : Veer Savarkar : वीर सावरकर विचारांची ‘एक तरी पणती लावुया…’

हिंदू कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तपास केला असता, आरोपी अनस कुरेशी (Anas Qureshi) लालबागमधील मेहता मेशन इमारतीमध्ये असलेल्या सॅमसंग स्मार्ट प्लाझा या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या दुकानात सेल्समन म्हणून सॅमसंग कंपनीकडून नोकरीस असल्याचे समजले. त्यानंतर त्याचा शोध घेत कार्यकर्त्यांनी दुकानमालकाशी संपर्क साधला. यानंतर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.

एफआयआरनुसार, आरोपी अनस कुरेशीने (Anas Qureshi) त्यांच्या व्हॉट्सअॅप पोस्टमध्ये औरंगजेबाचा (Aurangzeb) फोटो शेअर करत त्यावर “हबीबी… जो हमे हरा नहीं पाए मैदान- ए- जंग में और वो हमसे बदला ले रहें है मैदान ए सिनेमा हॉल में’ असे लिहले होते. हिंदू धर्माच्या भावना आणि श्रद्धा दुखावण्याचा त्याचा हेतू असल्याने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

तक्रारदार रवींद्र दाभोलकर (Ravindra Dabholkar) यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पोलिसांनी आरोपीस फोन करून माफी मागायला लावली. त्यानुसार त्याने फोनवरच माफी मागितली. मात्र त्याने समोर येऊन माफी मागावी, असा आग्रह समस्त कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे अनस कुरेशीला ताब्यात घेण्यात आले. (Aurangzeb)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.