केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या (Farmer) हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने पीक विमा योजनेचा विस्तार करण्याचा हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ६९ हजार ५१५ कोटी रुपयांच्या वाटपांसह पंतप्रधान पीक विमा योजनेच्या विस्तारास मंजुरी दिली आहे.
या योजनेचा ४ कोटी शेतकऱ्यांना (Farmer) लाभ होणार आहे.. यासोबतच डीएपी खताच्या किमतीही वाढणार नाहीत. याव्यतिरिक्त ८०० कोटी रुपयांच्या वाटपासह इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी (FIAT) साठी एक निधीची तरतूद केली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. २०२५ वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी निर्णय घेण्यात आले.
डीएपी खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी मंत्रिमंडळाने विशेष पॅकेज मंजूर केले आहे. यात डीएपी उत्पादकांसाठी सध्याच्या अनुदानाव्यतिरिक्त आर्थिक साहाय्याचा समावेश आहे. शेतकऱ्यांना (Farmer) परवडणाऱ्या किमतीत DAP उपलब्ध करुन देण्यासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी (NBS) च्या व्यतिरिक्त डी-अमोनियम फॉस्फेटवरील वन टाईम विशेष पॅकेजच्या विस्तारास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community