गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.(Farmer Protest) किमान आधारभूत किमतींसह (MSP) मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीत घुसण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली. त्यातही सरकारचे प्रस्ताव मान्य झालेले नाहीत.(Farmer Protest)
(हेही वाचा- NCP MLA Disqualification : अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव )
लोखंडी जाड पत्रे लावून करणार पोलिसांचा सामना
आंदोलक शेतकरी (Farmer Protest) सध्या शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत. ते शेतकरी उद्या दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. रस्त्यावर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशीन घेऊन शेतकरी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर बुलेटपासून मशीन ऑपरेटर्सला वाचवण्यासाठीही या मशीन्समध्येही बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण केबिन लोखंडी जाड पत्र्यांनी फुलप्रूफ करून सरकारविरोधातील आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे.(Farmer Protest)
शेतकऱ्यांनी अशी सुमारे 7 ते 8 मशिन तयार केली आहेत. ती पंजाब आणि हरियाणा, शंभू, खन्नौरी आणि डबवली सीमांवर तैनात करण्यात आली आहेत. सरकारने लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचीही तयारी केली जात आहे.(Farmer Protest)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community