शेतक-यांचा पुणतांब्यातून पुन्हा एल्गार; ‘या’ मागण्यांसाठी धरणे आंदोलन

138

पुणतांबा येथील शेतक-यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. पुणतांब्यात बुधवारपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरु होणार आहे. राज्यातील शेतक-यांच्या विविध समस्यांवर शेतक-यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

पाच वर्षांपूर्वी, 2017 मध्ये पुणतांब्यातील शेतक-यांनी एक जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. त्यानंतर राज्यातील इतर शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्याने राज्यात तत्कालीन भाजप सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला होता. आता त्याच पुणतांब्यातून शेतक-यांनी आंदोलन सुरु केले आहे.

( हेही वाचा : तुमची ऑनलाइन फसवणूक झालीय? विमा काढा, निर्धास्त राहा )

कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन

  • ऊसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे.
  • शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे.
  • कांद्यासह प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान द्यावे.
  • शेतक-यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी.
  • थकित विजबिल माफ झाले पाहिजे.
  • कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी.
  • सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करुन निर्णय द्यावा.
  • 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
  • दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा.
  • दुधाला कमीतकमी चाळीस रुपये दर दिला जावा.
  • खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी.
  • वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी.
  • शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे.
  • वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्यात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.