भारतात येत्या २३ जूनपासून मान्सून सक्रीय होणार आहे. पूर्ण देशात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला आहे. पण त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येत्या २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मान्सून बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यापूर्वी नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्याआधीच ११ जूनला नैऋत्य मोसमी वारे हे तळकोकणात दाखल झाले. पण त्यांची वाटचाल पुढे थांबली. त्यामुळे मान्सून लांबल्याने विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. २३ जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज असल्यामुळे आणखी ६ दिवस विदर्भात उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.
(हेही वाचा – Biporjoy Cyclone: गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले बिपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रसह ‘या’ आठ राज्यांमध्ये वादळाचा प्रभाव)
गेल्या ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र ११ जून रोजी मान्सूनने महाराष्ट्रातील काही भागात हजेरी लावली. राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्यानुसार गुरुवारी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये भारतात येत्या ४ आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. येत्या २३ जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता आहे. गेल्या ११ जून रोजी मान्सूनने हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community