दिल्ली-एनसीआरच्या वाहतूक व्यवस्थेवर बुधवारपासून विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे (Farmers Movement) दिल्लीतील एक कोटीहून अधिक लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आंदोलकांनी केलेल्या आंदोलनापूर्वीच दिल्लीत वाहतूक कोंडी सुरू झाली होती. कालिंदी कुंज, गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी नोएडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चाच्या घोषणेमुळे वाहतूक कोंडी वाढण्याचा धोका आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको; २४ फेब्रुवारीपासून दररोज मराठा आरक्षणाचे आंदोलन)
प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलीस बंदोबस्त
डीएनडी उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग खूपच मंदावरला आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी हरियाणातील शंभू सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्याच धर्तीवर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. टिकरी बॉर्डरवर १३ थरांची सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून डायड्रोकोलिक आणि पोकलेन मशीनचीही तयारी सुरू आहे. बुधवारी दिल्लीच्या सीमेवर कड वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रत्येक एंट्री पॉइंटवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमा मजबूत केल्या आहेत. हरयाणाच्या सिंघू आणि टिकरीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. कॉंक्रीट आणि लोखंडी खिळ्यांनी बनवलेल्या बॅरिकेड्सचे अनेक स्तर तेथे बसवण्यात आले आहेत. गाझीपूर सीमेवरील दोन मार्गिकाही बंद करण्यात आल्या आहेत.
एनएच-९वर यूपी गेट सीमेवर प्रचंड गर्दी
याविषयी एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, गरज भासल्यास बुधवारी गाझीपूर सीमाही बंद केली जाऊ शकते, पण दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे आणि एनएच-९वर यूपी गेट सीमेवर प्रचंड गर्दी असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते.
हेही पहा –