Farmers Protest : ७०० शेतकरी आंदोलकांना अटक; पंजाबमधील आप सरकारची आंदोलकांवर कारवाई

45

शंभू-खनौरी सीमेवर (Shambhu-Khanauri Border) वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनावर पंजाब सरकारने कठोर कारवाई केली. (Farmers Protest) पंजाब पोलिसांनी बुधवार, १९ मार्च या दिवशी शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या ७०० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. सरकारने बुलडोझरच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे तंबू हटवले. केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चंदीगडमध्ये झालेल्या चर्चेची सातवी फेरीही फोल ठरली. त्यानंतर सरकारने ही कारवाई झाली. पंजाब सरकारने (Punjab Government) शेतकरी संघटनेचे प्रमुख शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल, सर्वन सिंग पंढेर, अभिमन्यू कोहर, काका सिंग कोटाडा आणि इतरांना ताब्यात घेतले.

(हेही वाचा – IPL 2025 : हार्दिकच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादव करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व)

शेतकरी नेते आणि केंद्रीय शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेचा सातवा टप्पा बुधवारी संपला. बुधवारी सकाळी ११.५० वाजता या बैठकीसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे सेक्टर-२६ येथील महात्मा गांधी सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले होते. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियान हे देखील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक चार तास चालली. मात्र चर्चेच्या शेवटी तोडगा निघाला नाही. यासंदर्भात पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.

त्यानंतर पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर मोठी कारवाई केली. या वेळी १३ महिन्यांपासून बंद असलेली हरियाणा-पंजाबची शंभू सीमा उघडण्याचे काम सुरू झाले. सुमारे ३००० पोलिसांचे पथक खनौरी बॉर्डर पॉईंटवर पोहोचले होते. या वेळी पोलिसांनी खनौरी सीमेवर सुमारे ५०० ते ७०० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. १३ फेब्रुवारी २०२४ पासून हे आंदोलन सुरू होते. मात्र बुधवारी आपचे भगवंत मान सरकार वर्षभरानंतर अॅक्शन मोडमध्ये आले आणि शेतकऱ्यांचे तंबू बुलडोझरने उद्ध्वस्त केले. (Farmers Protest)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.