चंदीगड – कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणारी दोन कृषी विधेयके राज्यसभेत आवाजी मताने मंजूर होताच याचा पहिला विरोध पंजाबमध्ये झाला. येथे शेतकरी रस्त्यावर उतरले आणि ‘रास्ता रोको’ करत महामार्ग बंद केले. शेकडॉ शेतकरी केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंबालाच्या रस्त्यांवर उतरले. यात काही शेतकरी ट्रॅक्टरसहीत रस्त्यावर आले आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागले.
Haryana: Youth Congress workers set a tractor on fire during the protest over #FarmBills, at Sadopur border in Ambala. https://t.co/exwhnTKmuv pic.twitter.com/D37y6KeCe0
— ANI (@ANI) September 20, 2020
आंदोलनकर्त्या शेतकऱयांनी फतेहाबाद – सिरसा, बरवालात पंचकुला – यमुनानगर हे महामार्ग बंद केले. पंजाबहून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. या शेतकऱ्यांना हरियाणातल्या अनेक संघटनांचे समर्थन आणि पाठबळ मिळाले. त्यामुळे पोलिसांनाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबाला सीमेपासून राजधानी दिल्लीपर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.पंजाबमध्ये मोहालीजवळ जीरकपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले.
कृषि विषयक विधेयकाविरोधात चंदीगड ते दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत हे शेतकरी आहेत. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून करनाल हायवे ब्लॉक करण्यात आला. शेतकरी दिल्ली – अंबाला – चंदीगड महामार्ग रोखण्याच्या तयारीत होते. शेतकऱ्यांचं आंदोलन पाहता अंबालामध्ये सादोपूर सीमेवर पोलीस दल तैनात करण्यात आले.
Join Our WhatsApp Community