केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या येत्या १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात नेमके काय असणार? याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ८ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेअंतर्गत ६ हजार रुपये मिळत आहेत.
( हेही वाचा : भारताने दोन वर्षांत विकसित केल्या चार स्वदेशी लसी! केंद्रीय मंत्र्यांची माहिती )
यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ही दिलासादायक बातमी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी सन्मान निधीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या वर्षातून ३ वेळा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दिला जातो परंतु आता चार टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
सन्मान निधी योजना म्हणजे काय ?
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रतीवर्ष लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.