Latur : राज्यात वाहन अपघातात (vehicle accident) मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच लातूर जिल्ह्यात ST बस उलटून २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यत कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे. (Latur)
मिळालेल्या माहीतीनुसार, लातूर-चाकूर मार्गावरील (Latur-Chakur Road) नांदगावपाटीजवळ हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस अहमदपूरवरून लातूरकडे येत होती. नांदगावपाटीजवळ अचानक बाईक बससमोर आली. बाईक चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटली. टर्न घेत असताना हा अपघात झाला. बाईक स्वाराला वाचवताना एसटी बसच्या (ST bus Accident) चालकाने भारधाव बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचे नियंत्रण सुटले आणि टर्निंगवर बस उलटी झाली. बस उलटून २० ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – bicycle for kids : लहान मुला-मुलींसाठी असणाऱ्या बाईकची किंमत काय?)
राज्यात नऊ वर्षांत रस्ते अपघातांमध्ये १ लाख २२ हजार २७० जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर २ लाख ५८ हजार ७२३ जण जखमी झाले आहेत. रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी राज्यभर उपाययोजना होत असतानाही अपघात व त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यामध्ये मुंबई, तर मृतांमध्ये पुणे अव्वल आहे. तर सोलापूर शहरात कमी अपघात झाले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community