Pune-Solapur Highway वर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत तीन ठार, १५ जखमी

76

पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट मिनी बसला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार, बसचालकासह तिघे ठार झाले आहेत. तर बसमधील 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (9 फेब्रुवारी) दुपारी 2 वाजेच्या सुमारास कोळेगाव पाटीजवळ (Kolgaon Pati) घडली. मिनी बसमधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन पंढरपूरकडं विठ्ठलाच्या (Pandharpur Vitthal Temple) दर्शनासाठी निघाले होते. (Pune-Solapur Highway)

(हेही वाचा –Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (Solapur Rural Police) दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला धडक (BUS Accident) बसली आहे. मिनी बस तुळजापूर, अक्कलकोट दर्शन करून पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेली होती. बस क्र. एम. एच. १२. के. क्यू ११ ७५ सोलापूर-पुणे हायवेवरून पंढरपूरकडे जात असताना कोळेगाव पाटी येथे आली. कोळेगाव चौकात हा विचित्र अपघात झाला. दुचाकी स्वार, बसचालक आणि एक महिला या तिघांचा मृत्यू जागीच झाला आहे.

(हेही वाचा – chyawanprash खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात? चला जाणून घेऊया)

चालकांसह दुचाकीस्वाराचा मृत्यू   

सोलापूर पुणे महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले (वय ३५, रा. चंदनगर, लांबोटी ता. मोहोळ), मिनी बसचालक लक्ष्मण बासू पवार (वय ४०) व ३५ ते ४० वयोगटातील एक अनोळखी महिला असे तिघे ठार झाले आहेत. कोमल अनिल जोरकर, भक्ती पांडुरंग मांढरे, बेबी सुधाकर गायकवाड, अनिता शंकर बारगे, संगीता रवींद्र शेडगे, कोमल सचिन मांढरे, रेश्मा नितीन चौधरी, सोनाली रमेश आडुळकर, सपना रमेश माहिते, अरव अरुण खाडे, परी अनिल जोरकर, सई गौस प्राची पाडुरंग मांढरे, छाया रतन शेडगे, रेखा दत्तात्रय चौधरी मांढरे हे जखमी झाले आहेत. बसमधील प्रवासी जखमी झाले. जखमींना सोलापूर (Sopalur) येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघातप्रकरणी तेजस्विनी मयूर मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.