राज्यात अपघाताचे सत्र सुरु आहे. मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात (Dadar accident case) झाला. दादरच्या सेनापती बापट फ्लायओव्हरवर काळी-पिवळी टॅक्सी आणि कारच्या धडकेत (Taxi and car accident) चालकासह प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगातील कारने टॅक्सीला समोरुन धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यात टॅक्सीचा पूर्णपणे चक्काचूक झाला आहे. (Dadar)
दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण एलफिन्स्टन पुलावर (Elphinstone Bridge) दुभाजक नाही. त्यात वाहनांचा वेग जास्त असल्यानं अपघाताची तीव्रता वाढली असावी असं सांगितलं जात आहे. अपघाताची भीषणता अंगावर काटा आणणारी आहे. ज्या परिसरात हा अपघात घडला तिथं आजूबाजूला अनेक बड्या कंपन्यांची कार्यालयं आहेत. लाखो कर्मचारी या ठिकाणी कामासाठी येत असतात. पण शनिवार असल्यानं नेहमीपेक्षा वर्दळ कमी होती आणि रस्ताही तसा मोकळा होता.
(हेही वाचा – BMC School : मुंबई महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे; सोमवारपासून क्रीडांगणाची स्वच्छता राखली जाणार)
तसेक मोकळ्या रस्त्यावरुन वेगात वाहन दामटवण्याची खुमखूमी महागात पडल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघाताच्या घटनेनंतरचा व्हिडिओ-घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं. हे पाहण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासलं जाणार असल्याचं समजत आहे. त्यातून अपघाताची नेमकी माहिती समोर येऊ शकेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community