पत्नीसोबतच्या भांडणातून चिमुकल्यासोबत केले असे काही ज्यामुळे…

हा आघात तो चिमुकला जीव सहन करू शकला नाही. त्यामुळे...

नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणातून निर्दयी पित्याने आपल्याच चार वर्षांच्या चिमुकल्याची रेल्वे प्लॅटफॉर्मवर आपटून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, निर्दयी पित्याला जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडले नेमके?

सानपाडा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर सोमवारी सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी पिता सकलसिंग पवार याने दोन लग्न केली असून, प्लॅटफॉर्मवर आपल्या कुटुंबासोबत चालत असताना त्याचा आपली दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत पैशांवरुन वाद चालू होता. या वादादरम्यान सकलसिंग याने रागाच्या भरात आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या 4 वर्षांचा मुलगा प्रशांत याला दोन वेळा प्लॅटफॉर्मवर जोरात आपटले. स्टेशनवरील लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हा आघात तो चिमुकला जीव सहन करू शकला नाही. त्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

(हेही वाचाः भयानक! बेपत्ता आई आणि मुलाच्या वहीत सापडले असे काही, ज्यामुळे…)

आरोपी पित्याला अटक

वाशी रेल्वे पोलिसांनी याबाबत पिता सकलसिंग याला अटक केली आहे. हे कुटुंब मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील असून, कामधंद्यासाठी ते नवी मुंबई येथे आले होते. सानपाडा येथील उड्डाणपुलाखाली त्यांनी आपला संसार थाटला होता. त्याची पहिली पत्नी गावी असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी पित्याला वाशी रेल्वे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली आहे.

(हेही वाचाः पिंपरी-चिंचवड हादरले… 48 तासांत झाले चार खून)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here