रशिया-युक्रेन युद्धात पहिला भारतीय बळी गेला. युक्रेनमध्ये शिकत असलेला कर्नाटकातील नवीन याचा युक्रेन युद्धात गोळीबारमध्ये मृत्यू झाला. नवीन याचे वडील शेखरप्पा म्हणाले की, भारतातील आरक्षण व्यवस्थेमुळे माझ्या मुलाला युक्रेनमध्ये शिकायला जावे लागले, असे विधान केले.
…म्हणून मुले परदेशात जातात
नवीन याला एमबीबीएसच्या प्रवेशपूर्व परीक्षेत ९७ टक्के गुण मिळाले होते, तरीही त्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे नवीन याला युक्रेन येथे जाऊन शिक्षण घ्यावे लागले, असे शेखरप्पा म्हणाले. शेखरप्पा हे सेवानिवृत्त मॅकेनिकल अभियंता आहेत. जातीनिहाय आरक्षण आणि भरमसाठ देणग्या या कारणांमुळे देशातील हुशार, बुद्धीवान मुलांना नाईलाजास्तव परदेशात जावे लागत आहे, असे शेखरप्पा म्हणाले.
(हेही वाचा आता भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्यास होतोय विरोध…)
शेखरप्पा यांनी केली मागणी
भारतात एमबीबीएसकरता देणग्या द्यावा लागतात, हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे भारतात कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा ते युक्रेनमध्ये शिकायला जातात. भारतात प्रवेश हे जाती आधारीत प्रवेश दिले जात आहेत, असेही शेखरप्पा म्हणाले. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला युक्रेनमध्ये पाठवले आणि गमावले. नवीन हा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षांत शिकत होता. त्यामुळे भारतातील हुशार मुलांना जर भारतातच रहायचे असेल तर वैद्यकीय क्षेत्रात आरक्षण आणि देणग्या बंद कराव्यात, अशी विनंती शेखरप्पा यांनी केली.
Join Our WhatsApp Community