RBI कडून FD च्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ न केल्यास मिळणार कमी व्याज

Fixed Deposite च्या बाबतीत RBI कडून गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा बदल करण्यात आला होता. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर एफडीच्या रक्कमेवर क्लेम केला नाही तर मिळणारे एफडीवरचे व्याज कमी होणार असल्याचा नियम आरबीआयकडून करण्यात आला होता. हा नियम आता लागू करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

काय आहे नवा नियम?

सेव्हिंग अकाऊंटच्या तुलनेत एफडीवरच्या ठेवींवर बँकांकडून जास्त व्याज देण्यात येते. त्यामुळे खातेधारकांकडून एफडीला पसंती दिली जाते. पण आता एफडीची मॅच्युरिटी संपल्यानंतर जर रक्कमेसाठी क्लेम करण्यात आला नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी होईल. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळणा-या व्याजाइतके असेल. हा नवा नियम सर्व व्यावसायिक बँका, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका आणि स्थानिक प्रादेशिक बँकांसाठी लागू असणार आहे.

(हेही वाचाः मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, पोलिसांनी जारी केले आदेश)

मॅच्युरिटीनंतर पैसे काढणे फायद्याचे

याआधी असलेल्या नियमानुसार, एफडी मॅच्युअर झाल्यानंतर बँकेकडून त्याच व्याजदरात एफडीची मुदत वाढवण्यात(Auto Renewal)येत होती. मात्र आता मॅच्युरिटीनंतर पैसे काढले नाहीत, तर एफडीवरील ठेवीवर सेव्हिंग अकाऊंट इतकेच व्याज मिळणार असल्याने मॅच्युअर झाल्यानंतर एफडीतून पैसे काढणेच फायद्याचे आहे. 5 ते 10 वर्षांच्या दीर्घकालीन एफडीवर सध्या बँकांकडून 5 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देण्यात येते, तर सेव्हिंग अकाऊंटवर 3 ते 4 टक्क्यांनी व्याज दिले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here