RBI कडून FD च्या नियमात मोठा बदल! जर मॅच्युरिटीनंतर पैसे काढले नाहीत तर…

147

बॅंकांमध्ये खातेधारकांकडून मुदत ठेव म्हणजेच Fixed Deposite च्या स्वरुपात पैसे जमा केले जातात. पण आता याच FD च्या बाबतीत देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या RBI कडून मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एफडीच्या रक्कमेवर क्लेम केला नाही तर तुम्हाला मिळणारे एफडीवरचे व्याज कमी होणार आहे. त्यामुळे या नियमाची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

(हेही वाचाः खोट्या नोटा वाढल्या! RBI ने सांगितली धक्कादायक आकडेवारी)

असा आहे नवा नियम

सेव्हिंग अकाऊंटच्या तुलनेत एफडीवरच्या ठेवींवर बँकांकडून जास्त व्याज देण्यात येते. त्यामुळे खातेधारकांकडून एफडीला पसंती दिली जाते. पण आता एफडीची मॅच्युरिटी संपल्यानंतर जर रक्कमेसाठी क्लेम करण्यात आला नाही, तर त्यावर मिळणारे व्याज कमी होईल. हे व्याज सेव्हिंग अकाऊंटवर मिळणा-या व्याजाइतके असेल, असे सांगण्यात येत आहे. हा नवा नियम सर्व व्यावसायिक बँका, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका आणि स्थानिक प्रादेशिक बँकांसाठी लागू असणार आहे.

मॅच्युरिटीनंतर पैसे काढणे फायद्याचे 

याआधी असलेल्या नियमानुसार, एफडी मॅच्युअर झाल्यानंतर बँकेकडून त्याच व्याजदरात एफडीची मुदत वाढवण्यात(Auto Renewal)येत होती. मात्र आता मॅच्युरिटीनंतर पैसे काढले नाहीत, तर एफडीवरील ठेवीवर सेव्हिंग अकाऊंट इतकेच व्याज मिळणार असल्याने मॅच्युअर झाल्यानंतर एफडीतून पैसे काढणेच फायद्याचे आहे. 5 ते 10 वर्षांच्या दीर्घकालीन एफडीवर सध्या बँकांकडून 5 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देण्यात येते, तर सेव्हिंग अकाऊंटवर 3 ते 4 टक्क्यांनी व्याज दिले जाते.

(हेही वाचाः 2 हजाराच्या नोटांबाबत RBI चा धक्कादायक खुलासा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.