अन्न पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेल आणि मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील महापे येथे मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे दोन दिवसांपूर्वी धाड टाकली. तब्बल 27 लाख 39 हजारांचा माल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला.
( हेही वाचा : …तर बाबर आझम होणार पाकिस्तानचा पंतप्रधान! गावसकरांनी का केले असे भाकीत? )
गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेली. नवी मुंबईतील महापे येथे एमआयडीसीच्या वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. या कारवाईत हळद पावडर (वजन 296 किलो), धनिया पावडर (वजन 3998 किलो), मिरची पावडर (वजन 6498 किलो), जीरे पाउडर (वजन 5454 किलो) तसेच करी पाउडर (वजन 2498 किलो) असा एकूण 27 लाख 39 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थाचा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला. जप्त केलेल्या अन्नपदार्थांपैकी ५ अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रयोगशाळा अहवालानंतर कारवाईबाबत निश्चित सांगता येईल, असे सांगण्यात आले.
कारवाईचे पथक –
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या आदेशानुसार तसेच कोकण विभागाचे सहआयुक्त (अन्न)चे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक आयुक्त (अन्न) विभागाचे अशोक पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे, यांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community