दिवाळीपूर्वी FDA ची मोठी कारवाई; मुंबईत ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त

156

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी मस्जिद बंदर येथून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवत तब्बल ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त केले आहे.  विनापरवाना हा साठा आढळून आल्याचे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तब्बल ४०० किलोचा २ लाख ९९ हजार ९९० रुपयांचा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला.

( हेही वाचा : प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन उदासीन)

दक्षता विभागाच्या अधिका-यांना मस्जिद बंदर येथे भेसळयुक्त तूप मिळाल्याची टीप मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवारी अधिकाऱ्यांनी मस्जिद बंदर येथील ऋषभ शुद्ध घी भांडार येथे धाड टाकली. या गोदामामध्ये तूपाची निर्मिती विनापरवाना सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तूपाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवल्याची माहिती अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाईची नियमाप्रमाणे दिशा ठरेल, असेही केकरे म्हणाले. तूपाचा दर्जा अन्न व औषध प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे नसल्यास दंडात्मक कारवाई होईल. तूपाचा दर्जा फारच खराब आढळून आल्यास न्यायालयीन खटला संबंधितांवर दाखल केला जाईल, असेही केकरे म्हणाले. जप्त केलेला हा साठा भेसळयुक्त असल्याचा दावा अधिका-यांनी केला आहे.

भेसळयुक्त तूप कसे ओळखाल

शुद्ध तूपात वनस्पती तूप असेल तर वास येतो आणि चव वेगळी लागते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.