अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत ९ ठिकाणी विविध छापे टाकून ८ लाख ५७ हजार ३५५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक करणारे आस्थापन सील व वाहतूक करणारे एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. (FDA Raid)
(हेही वाचा – BIT Chawl : माझगाव ताडवाडी आणि लव्हलेनमधील बीआयटी चाळींची दुरुस्तीचे काम लवकरच)
३६ आस्थापने सिल
गेल्या तीन दिवसात पुणे विभागात ३८ ठिकाणी विविध छापे (FDA Raid) टाकुन ९ लाख ३२ हजार ३८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ८ आस्थापने सिल करण्यात आल्या असून ९ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे विभागात ३६ आस्थापने सिल करण्यात आल्या असून २४ गुन्हे दाखल केले आहेत.
नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा (Gutkha), पान मसाला, सुगंधित तंबाकु (Tobacco), सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखूजन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यांवर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे. (FDA Raid)
(हेही वाचा – Abhyudaya Bank : आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ हटवले; प्रशासकाची नियुक्ती)
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे. (FDA Raid)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community