FDI Investment : भारतीय थेट परकीय गुंतवणूक २०२३ मध्ये ४३ टक्क्यांनी घटली, काय आहेत कारणं?

FDI Investment : परकीय गुंतवणुकीच्या क्रमवारीत आता ७ जागांची घसरण झाली आहे. 

121
FDI Investment : भारतीय थेट परकीय गुंतवणूक २०२३ मध्ये ४३ टक्क्यांनी घटली, काय आहेत कारणं?
  • ऋजुता लुकतुके

जागतिक गुंतवणूक आकडेवारीत भारताची ७ जागांनी घसरण होऊन भारत पंधराव्या स्थानावर घसरला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०२३ च्या आकडेवारीतून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. २०२३ मध्ये भारतात २८ अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक झाली. जी आधीच्या वर्षाच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी कमी होती. गेल्यावर्षी भारताची क्रमवारी ८ होती. आणि देशात ४८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक झाली होती. (FDI Investment)

भारताची घसरण झालेली असताना ब्राझील, कॅनडा, जर्मनी आणि मेक्सिको हे चार देश प्रगती करत आहेत. ब्राझील आता थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीतील पहिले ४ देश बदललेले नाहीत. ३११ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीसह अमेरिका अव्वल स्थानावर आहे. तर त्या खालोखाल चीन, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा क्रमांक लागतो. (FDI Investment)

(हेही वाचा – David Johnson Death : भारताचा माजी कसोटीपटू डेव्हिड जॉनसनच निधन)

भारतातील एकूण १६३ प्रकल्पांमध्ये परकीय गुंतवणूक

प्रत्यक्ष गुंतवणुकीत भारत मागे पडला असला तरी हरित ऊर्जा विषयीचे प्रकल्प आणि एकूणच नवीन प्रकल्पांच्या घोषणेच्या बाबतीत भारत पुढे आहे. गुंतवणुकीच्या एकूण मूल्याच्या बाबतीत भारत मागे असला तरी प्रकल्पांच्या संख्येच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या खालोखाल आहे. भारतातील एकूण १६३ प्रकल्पांमध्ये परकीय गुंतवणूक होणार आहे. या बाबतीत ३३४ प्रकल्पांसह अमेरिका अव्वल स्थानावर आहे. हरित ऊर्जेशी निगडित प्रकल्पांमध्ये १,०५८ प्रकल्पांसह भारत अमेरिका, युके आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या खालोखाल चौथ्या स्थानावर आहे. (FDI Investment)

भारतातून परदेशात गुंतवणूक मात्र २०२३ मध्ये वाढली आहे. या बाबतीत भारत आता २३ व्या क्रमांकावरून २० वर आला आहे. भारतातून परदेशात १५ अब्ज अमरेकिन डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे. २०२३ मध्ये सात देशांच्या केंद्र सरकारने गुंतवणुकीच्या बाबतीत केंद्रीय धोरण स्वीकारलं. बँका आणि देशांतर्गत कंपन्यांना सतत वित्त पुरवठा होत राहील यासाठी हे धोरण होतं. अर्जेंटिना, ब्राझील, चीन, मेक्सिको, भारत, तुर्कीये आणि संयुक्त अरब अमिराती असे हे सात देश आहेत. भारतीय शेअर बाजारात होणारी परकीय गुंतवणूकही २०२३ आणि २०२४ च्या दरम्यान ३.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. (FDI Investment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.