मऊ (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाच्या आणखी एका नेत्याची दुष्कृत्ये उजेडात आली आहेत. समाजवादी पक्षाचे माजी प्रदेश सचिव आणि मऊ बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वीरेंद्र बहादुर पाल यांच्या विरोधात बलात्काराच्या प्रकरणी प्रथमदर्शी अहवाल (FIR) दाखल झाला आहे. वीरेंद्र बहादुर पाल यांच्या महिला सहकाऱ्यानेच बलात्काराची तक्रार केली आहे. वीरेंद्र बहादूर पाल हे समाजवादी पक्षाचे माजी आमदार दयाराम पाल यांचा मुलगा आहे.
(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ‘या’ खेळाडूंनी गाजवली दुलिप करंडकाची पहिली फेरी)
रविवार, 8 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील मऊ पोलिसांनी वीरेंद्र बहादूर पाल यांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल दाखल केला आहे. एका महिला वकिलाने मऊ पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. वीरेंद्र बहादूर पाल यांनी महिला वकिलाला मद्य प्यायला दिले, तिच्यावर बलात्कार केला आणि या दुष्कृत्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकावले. या अश्लील व्हिडिओचा वापर करून महिला अधिवक्त्यावर वारंवार बलात्कार केला, असे या तक्रारीत म्हटले आहे.
मागील एक वर्षापासून होत आहे बलात्कार
महिला वकिलाने सांगितले की, अश्लील व्हिडिओ अणि छायाचित्रे काढून धमकावले जात आहे. तसेच मागील एक वर्षापासून बलात्कार होत आहे. वीरेंद्र बहादूर पालने तिला तिच्या इच्छेविरुद्ध लखनौला नेले. स्थानिक पोलिसांनी याची तक्रार नोंदवली नाही; परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे दाद मागितल्यावर कारवाई झाली. ही तक्रार नोंद झाल्यापासून वीरेंद्र बहादूर पाल फरार असून त्याला पकडण्यासाठी मळ पोलिसांनी विविध परिसरांत पोलिसांची पथके पाठवली आहेत.
समाजपादी पक्षाचे बलात्कारी प्रवृत्तीचे नेते
यापूर्वी अयोध्या आणि कनौजमध्येही पक्षाच्या दोन नेत्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. अयोध्येच्या पुरा कलंदर भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत सप नेत्याने तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता. मग तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. या प्रकरणी सप नेता मोईद खानला अटक करण्यात आली आहे. कनौजमध्ये सप नेते नवाब सिंह यादव यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community