-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मलबार हिल येथील कमला नेहरु उद्यानाच्या (Kamala Nehru Park) देखभालीसाठी आजवर ६८ माळी तैनात होते. या माळ्यांच्या माध्यमातून नेहरु उद्यानावर हिरवळ राखून त्यांची देखभाली जात होती. परंतु आता येथील माळ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जावून आता ही संख्या १४वर येवून पोहोचली आहे. त्यामुळे मागील काही काळांत माळ्यांची संख्या तब्बल ५४ ने कमी झाली आहे. त्यामुळे माळ्यांची संख्या कमी करून एकप्रकारे उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्याचा प्रयत्न केला जात असून या माध्यमातूनच आता कमला नेहरु पार्कची हिरवळ राखण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जात आहे.
मुंबईतील मलबार हिल जलाशयाच्या जवळ असलेल्या कमला नेरु पार्क (Kamala Nehru Park) उद्यानात मोठ्याप्रमाणात पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात. हे उद्यान मुंबईतील मोठे पर्यटन क्षेत्र बनले असून मलबारहिल जलाशय टेकडीवर असल्याने याची जबाबदारी उद्यान विभागाऐवजी जलअभियंता विभागाकडे आहे. परंतु या उद्यानाच्या देखभालीसाठी नेमलेले जाणारे माळी हे उद्यान विभागाच्या आस्थापनांमध्ये मोडली जाते.
(हेही वाचा – वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी संसदेत होणार सादर; Uddhav Thackeray कोणती भूमिका घेणार?)
या कमला नेहरु पार्कच्या (Kamala Nehru Park) मुख्य उद्यानासह येथील जलाशयाचा परिसर, जलअभियंता यांचे निवासस्थान, महापालिकेची सेवा निवासस्थान, टेकडी उतारावरील परिसर आदींची देखभाल करण्यासाठी अर्थात सर्व परिसराचे बागकाम आणि साफसफई करण्यासाठी एकूण ६८ माळी आदींची पदे मंजूर होती. परंतु आजवर विविध कारणांमुळे माळ्यांचा मृत्यू, सेवा निवृत्ती तसेच बदली यामुळे येथील बरीच पदे रिक्त झालेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत फक्त १४ कर्मचारी उद्यान आणि आसपासच्या भागाच्या साफसफाई आणि बागकामाकरता उपलब्ध आहे. तसेच त्यांच्या मार्फत देखभाल केली जाते.
परंतु ही पदे न भरता तसेच अपुऱ्या माळ्यांअभावी एवढ्या मोठ्या उद्यानाची देखभाल करणे शक्य नसल्याचे कारण देत महापालिकेने येथील उद्यानासह इतर भागाची देखभाल करण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. याठिकाणी हिरवळ कायम राखण्यासाठी विविध करांसह ६२ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठी जे व्ही इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड केली आहे. (Kamala Nehru Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community