Fifteenth Finance Commission Fund मंजूर; मुंबईतील ८९ मोकळ्या जागांची हिरवळींसह करणार सुधारणा

मुंबईमध्ये अधिकाधिक मोकळ्या जागांवर हिरवळ राखण्यास रोपांची लागवड करण्यासाठी हवेतील गुणवत्तेचा दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेल्या सुमारे ४८ कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

568
Fifteenth Finance Commission Fund मंजूर; मुंबईतील ८९ मोकळ्या जागांची हिरवळींसह करणार सुधारणा
Fifteenth Finance Commission Fund मंजूर; मुंबईतील ८९ मोकळ्या जागांची हिरवळींसह करणार सुधारणा
सचिन धानजी,मुंबई

मुंबईमध्ये अधिकाधिक मोकळ्या जागांवर हिरवळ राखण्यास रोपांची लागवड करण्यासाठी हवेतील गुणवत्तेचा दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेल्या सुमारे ४८ कोटी रुपयांच्या निधीतून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबई वगळता उर्वरीत सर्व ठिकाणच्या ८९ उद्यान, मैदानांसह मोकळ्या जागांवर वृक्षारोपणासह (Plantation) विविध प्रकारची सुधारणा केली जाणार आहे. (Fifteenth Finance Commission Fund)

राज्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण (Plantation) करून हरित क्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी महत्वपूर्ण योजना केंद्र शासनाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. या योजनेमध्ये मुंबई महापालिकाही सहभागी झाली असून शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक तिथे वृक्षारोपण करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाकडून हवेतील प्रदुषित गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध होत असून यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकरता मोकळ्या जागा, सार्वजनिक ठिकाणे आणि गृहनिर्माण सोसायट्या आदी ठिकाणी हिरवळ निर्माण करण्याच्या कामांसाठी ४७.८९ कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Fifteenth Finance Commission Fund)

त्याअंतर्गत कुलाबा ते भायखळा चिंचपोकळी आणि मुंबई सेंट्रलचा परिसर वगळता उद्यानांसह मोकळ्या जागांचा विकास केला जाणार आहे. उद्यान विभागामार्फत महापालिकेच्या ताब्यात असलेली उद्याने, मैदाने, मोकळ्या, वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक यामध्ये पर्यावरण व हवेची गुणवत्ता सुधारण्याकरता हिरवळ, रोपांची लागवड, शहरी वनीकरण तसेच याकरता पुरक अशी रंगरंगोटी, नामफलक, लहान मुलांची खेळण्याची साधने, पदपथ, जॉगिंग ट्रॅक, व्यायामाची साधने आदी प्रकारची कामे केली जाणार असल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये तुटलेल्या भिंतींचीही दुरुस्ती या अंतर्गत केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Fifteenth Finance Commission Fund)

(हेही वाचा – WFI Row : कुस्ती फेडरेशनच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता नाहीच)

अशाप्रकारे होणार उद्यान, मैदानांसह मोकळ्या जागांची डागडुजीसह सुधारणा
  • परिमंडळ दोन : ०९ उद्याने (खुशबू एंटरप्रायझेस : १.४४ कोटी रुपये)
  • परिमंडळ तीन : २० उद्याने (मावल कंस्ट्रक्शन : २. १२ कोटी रुपये)
  • परिमंडळ चार : १३ उद्याने (तिरुपती इंजिनिअर्स : १.८५ कोटी रुपये)
  • परिमंडळ पाच : ११ उद्याने (इंफिनाईट द टोटल सोल्युशन : १.७६ कोटी रुपये)
  • परिमंडळ सहा : १३ उद्याने (भूमी कॉर्पोरेशन: १.६० कोटी रुपये)
  • परिमंडळ सात : २३ उद्याने (हिरानी एंटरप्रायझेस: १.७९ कोटी रुपये) (Fifteenth Finance Commission Fund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.