Delhi Airport : पती-पत्नी मधील भांडणामुळे चक्क करावे लागले इमर्जन्सी लँडिंग

पती-पत्नीच्या भांडणामुळे विमानातील परिस्थिती बिघडल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

137
Delhi Airport : पती-पत्नी मधील भांडणामुळे चक्क करावे लागले इमरजन्सी लँडिंग
Delhi Airport : पती-पत्नी मधील भांडणामुळे चक्क करावे लागले इमरजन्सी लँडिंग

अनेकदा तुम्ही पती-पत्नीचे भांडण ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. आपण अनेकदा घरांमध्ये किंवा भर रस्त्यात झालेले आपण अनेक वेळा पहिले आहे . मात्र, चक्क विमानात पती-पत्नी भांडत होते. दरम्यान,म्युनिकहून येणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानात पती-पत्नीमध्ये भांडण झाले.दोघांमधील भांडण इतके वाढले की हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यामुळे दिल्ली मध्ये विमान इमरजन्सी लँडिंग करावे लागले. (Delhi Airport)

पती-पत्नीच्या भांडणामुळे विमानातील परिस्थिती बिघडल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान, लुफ्थांसाचे फ्लाइट क्रमांक LH772 म्युनिकहून थायलंडची राजधानी बँकॉकला जात होते.एका वृत्तसमूहाने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीच्या भांडणानंतर विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. तर दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलला ही माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी विमानतळावर पोहोचले आणि विमानाचे दरवाजे उघडण्याची वाट पाहू लागले. (Delhi Airport)

(हेही वाचा : Cylinder Blast : चेंबूर मध्ये सिलिंडरच्या स्फोटाने घर कोसळलं; चार जण जखमी)

भांडणाचे कारण कळू शकले नाही दरम्यान, हे पती-पत्नी कोठे राहणारे आहेत आणि त्यांच्यात भांडण कशामुळे झाले, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर दोघांनाही विमानातून उतरवण्यात आले की नाही हे देखील अद्याप समजू शकले नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.