बीडमध्ये शिवसेनेमध्येच फ्री स्टाईल! शहरप्रमुख धनंजय सोळंकेंना काठ्या, पट्ट्याने मारहाण!

शिवसैनिकांच्या मारहाणीत शहरप्रमुख धनंजय सोळंके जखमी झाले. या राड्यानंतर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. 

73

शिवसेना जिल्ह्याप्रमुखांच्या निवडीवरून गुरुवारी, २४ जून रोजी बीडमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या शरीरावर तेल फेकल्याबद्दल जाधव समर्थकांनी माजलगाव शहरप्रमुख धनंजय सोळंके यांना चोप दिला. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थकांमध्ये रस्त्यावरच फ्री स्टाईल मारामारी रंगली. काठ्या आणि पट्ट्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये धनंजय सोळंके जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्यानंतर मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

काही पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद होती!

शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीवरून शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला. आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर निवड झाली. मात्र यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि  पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला. या पदावर आधी सचिन मुळूक हे होते. मात्र त्यानंतर जेव्हा खांदेपालट करण्यात आला, तेव्हा मात्र काही पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद सुरु झाली.

(हेही वाचा : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या, तरी ओबीसी मंत्री गप्प का? )

सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप

माजलगाव शहरात आप्पासाहेब जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले होते. रॅलीत शेकडो गाड्या आणि हजारो लोक सहभागी झाले होते. माजलगाव शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या दरम्यान, कर्तव्यावर असलेला एक पोलिस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला. या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.