Film City : वाढत्या आगी आणि अतिक्रमणांबाबत फिल्म सिटीत लवकरच स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आणि तारेचे कुंपण

31
Film City : वाढत्या आगी आणि अतिक्रमणांबाबत फिल्म सिटीत लवकरच स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आणि तारेचे कुंपण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

आरे फिल्म सिटी (Film City) अर्थात चित्रनगरीत लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार असून चित्रनगरीच्या (Film City) स्वतःच्या मालकीच्या जागेत अधिक अतिक्रमण होऊ नये यासाठी लवकरच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून सभोवताली कुंपण घालण्यात येणार आहे.

चित्रनगरीच्या (Film City) अखत्यारीत असलेल्या जागेमध्ये नुकतीच आग लागली होती त्या पार्श्वभूमीवर खासदार वायकर यांनी सोमवारी चित्रनगरीत बैठक घेतली. या बैठकीला व्यवस्थापकीय संचालकी स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावलकर, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिपूरकर, नायब तहसीलदार किरण आम्बुर्ली, भूमापक आर. जे. ठाकुर, पी दक्षिण महापालिका सहाय्यक आयुक्त संजय जाधव, अग्निशमन दलाचे अधिकारी सोमनाथ जायभाय, वनपाल आर. पी. पाटोळे, आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – BMC : चुनाभट्टी, कुर्ला येथील रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही याबाबत महापालिका प्रशासन साशंकच)

चित्रनगरीच्या (Film City) जागेतील आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करावी. सर्व मुलभूत सोई-सुविधा देऊन उपजीविकेच्या साधानासाहित त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी सुचना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी चित्रनगरीत व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत दिली.

चित्रनगरीत (Film City) लागणाऱ्या आगीच्या घटना लक्षात घेता फायर टेंडर अपलोड करण्यात आले आहे. चित्रनगरीतील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा उभारणार असून एका फायर अधिकाऱ्याची नेमणूक ही करणार असल्याची माहिती म्हसे पाटील यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – BMC Election : आता ऑक्टोबर, नोव्हेंबर शिवाय महापालिका निवडणुकीला नाही मुहूर्त)

चित्रनगरीने (Film City) स्वतःच्या जागेत अधिक अतिक्रमण करण्यात येऊ नये यासाठी जागेचे सर्वेक्षण करून जागे सभोवताली कुंपण घालण्याच्या सूचना खासदार वायकर यांनी सूचना देताच अशा प्रकारे सर्वेक्षणाचे काम तात्काळ सुरु करण्यात येईल असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक म्हसे पाटील यांनी दिले.

चित्रनगरीचा (Film City) मास्टर प्लॅन तयार करण्यात येत असून टप्प्यात टप्प्याने त्याचा विकास करण्यात येणार असून पीपीपी अथवा स्वयंम विकासाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी यावेळी खासदारांना दिली. ‘आझादी का अमृत फंड निधी’च्या माध्यमातून सध्या चित्रनगरीतील स्टुडिओचे नूतनीकरणाचे काम सुरु असल्याची माहितीही म्हसे पाटील यांनी दिली.

(हेही वाचा – Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन)

चित्रनगरीतील (Film City) आदिवासी पाड्याचे पुनर्वसन करताना त्यांच्याशी चर्चा करून शासनाच्या नियमानुसार काम करावे, अशी सूचना वायकर यांनी यावेळी दिली. चित्रानगरी तील अनधिकृत गोदामे काढून टाकण्यात यावीत, शाळेच्या बसेस चित्रनगरीतून जाण्याची मुभा द्यावी, वनराई पोलीस स्टेशन येथील रस्ता खुला करावा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही खासदार वायकर यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या. त्याही त्यांनी मान्य केल्याचे वायकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.