बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुड्डा यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Film) हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली आहे. शुक्रवार, २२ मार्चपासून सिनमागृहात ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Film) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाला समाजातील सर्व घटकाची पसंती
रणदीप हुड्डा यांचा बहुप्रतीक्षित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट (Swatantra Veer Savarkar Film) विनायक दामोदर सावरकर उपाख्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील बायोपिक असून २२ मार्च २०२४ रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरने समाजातील सर्व घटकांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या चित्रपटातलं वीर सावरकरांवरील एक रॅप सॉंग प्रदर्शित झालं होतं आणि तरुणांना हे गाणं खूपच आवडलं. अनेक लोकांनी हे गाणं पाहून वीर सावरकरांवर अशा प्रकारचं गाणं तयार होऊ शकतं, याविषयी कौतुक केलं. त्याचबरोबर रणदीप हुड्डा यांनी इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी काळ्या पाण्याच्या प्रसंगासाठी आपलं वजन लक्षणीयरित्या कमी केलं होतं. या छायाचित्रानेही लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
हा चित्रपट अधिकाधिक जणांनी पहावा यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित आणि सशस्त्र क्रांतीचा इतिहास सांगणारा रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि त्यांनी अभिनय केलेला चित्रपट करमुक्त करावा. जेणेकरून वीर सावरकर आणि सशस्त्र क्रांतीचा दडवला गेलेला इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असे X वर रणजित सावरकर यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर के जीवनपर आधारित और सशस्त्र क्रांति का इतिहास बतानेवाली @RandeepHooda द्वारा निर्देशित, अभिनीत फिल्म टैक्स फ्री की जानी चाहिए| इससे सावरकर और सशस्त्र क्रांति का दबाया गया इतिहास आम जनता तक पहुंचाया जाएगा|@narendramodi @AmitShah @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Ranjit Savarkar (@RanjitSavarkar) March 22, 2024
Join Our WhatsApp Community