अखेर वर्षभरानंतर डॉ. गोमारे बनल्या कार्यकारी आरोग्य अधिकारी!

महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर या ३० जून २०२० रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्या रिक्तजागी सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची निवड करून त्यांच्याकडे हे प्रभारी पद सोपवले होते.

आरोग्य विभागाच्या सह कार्यकारी आरोग्य अधिकारीपदी असलेल्या मंगला गोमारे यांना कार्यकारी आरोग्य अधिकारीपदी पदोन्नतीचा प्रस्ताव अखेर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंजूर केला. मागील वर्षभरापासून सभागृहाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव प्रलंबित होता. कोविड काळात आरोग्य विभागाच्या योगदानाबद्दल माध्यमांसमोर कौतूक करणाऱ्या सत्ताधारी पक्ष आणि महापौरांकडून प्रत्यक्षात हा प्रस्ताव रोखून धरत त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु अभियंत्याच्या पदोन्नतीच्या उठलेल्या वादळात सत्ताधारी पक्षावर टीका होवू लागल्यानंतर अभियंत्यांबरोबरच डॉ. मंगला गोमारे यांच्याही पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

जून २०२० पासून जागा होती रिक्त

महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर या ३० जून २०२० रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्या रिक्तजागी सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची निवड करून त्यांच्याकडे हे प्रभारी पद सोपवले होते. या पदाचा भार स्वीकारण्यापूर्वी मंगला गोमारे यांनी कोविडमध्ये प्रसुतीगृहांसह इतर ठिकाणच्या सुविधांची जबाबदारी सांभाळत होत्या. परंतु केसकर यांच्या रिक्त जागी त्यांची प्रशासनाने त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर गोमारे यांची कार्यकारी आरोग्य अधिकारीपदी कायम नियुक्ती करण्याचा प्रस्ताव समितीमध्ये मंजूर केल्यानंतर महापालिका सभागृहापुढे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव सभागृहापुढे सादर झाल्यानंतर तब्बल चार वेळा प्राधान्य क्रम घेण्यात आला होता. परंतु चारही वेळा महापौर किशोरी पेडणेकर आणि सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी हा प्राधान्य क्रम विचारातच घेतला नव्हता नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव सभागृहापुढे प्रलंबित असल्याने डॉ. मंगला गोमारे या कार्यकारी आरोग्य अधिकारी यापदावर कायम होण्यापासून वंचित राहिल्या होत्या. कोरोना काळात गोमारे यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार तसेच मार्गदर्शनाखाली समर्थपणे पार पाडली. मात्र, ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी कुठेही स्वत: ला कमी पडून न देता स्वत:ला सिध्द करत आरोग्य विभागाचा कारभार सचोटीने पार पाडला. मात्र, मागील वर्षभरापासून सभागृहाच्या कामकाजाच्या पटलावर तळाला जावून पडलेला हा प्रस्ताव अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्तावाचा विचार करताना पुढे आणला गेला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र,वर्षभरापासून हा प्रस्ताव मंजूर न होत नसल्याने प्रचंड नाराज होत्या. एकप्रकारे मानसिक त्रासच त्यांना दिला जात होता. परंतु त्याचा परिणाम त्यांनी कधीही कामावर होवू दिला नाही.

(हेही वाचा : ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच केले अंत्यसंस्कार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here