खिळ्यांच्या बंधनातून मुंबईची झाडेमुक्त

झाडांवरील होर्डिंगबाजीत खिळे, फलक आणि क्राँकीटीकरणातून अखेर झाडांनी मोकळा श्वास घेता आला. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण, उद्यान विभाग तसेच इतर पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने वृक्ष संजीवनी अभियानातून १२३ किलो खिळ्यांचा भार झाडांवरून काढला गेला. तर १० हजार ३७९ खिळे, फलक आणि कॅबल्स मुंबईच्या झाडांचा विद्रुप बनवत होती. गेले आठवडाभर चालवेल्या वृक्ष संजीवनी अभियानातून हा भार मुक्त झाल्याने मुंबईतील झाडांना नवी संजीवनी मिळाली आहे.

वृक्ष संजिवनी अभियान

आपल्या दुकानांची जाहिरातबाजी, चहा धारकांच्या स्टॉल्सची माहिती देणारी फलके, मुंबईभर झाडांना खिळे ठोकून विद्रुप बनवत होती. हा प्रकार बेकायदेशीररित्या सुरु होता. झाडांच्या मुळाशी विशिष्ट अंतर राखत बांधकाम करण्याचा नियम असताना पालिकेचा रस्ता विभागच हा नियम मोडीत काढत होता. त्यामुळे मुळांना पाणी झिरपण्याची जागा उरली नव्हती. कित्येक रेन ट्री, पिंपळ आणि वडाची झाडे सुकून गळून पडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे वृक्ष संजीवनी अभियान मोठ्या स्तरावर राबवले गेले.

कुठे आढळली झाडांवरची विद्रूपता ?

सर्वात जास्त खिळे टी वॉर्डात दिसून आले. टी वॉर्डातील झाडांवर २९.३४९ किलोचे खिळे ठोकले गेले होते. याच प्रभागातून १६७ झाडांवरील सिमेंटचे आच्छादन काढले गेले. केई वॉर्डातील झाडांमध्ये सर्वात जास्त पोस्टरमुळे कुरुपता आली होती. १८६ पोस्टर्स या वॉर्डात दिसून आले.

  •  मुंबई शहराची सुरुवात असलेल्या ए वॉर्डात केवळ ५१ खिळे आढळून आले. त्यानंतर प्रत्येक वॉर्डातील झाडांवर किमान शंभर खिळे तपासणी अंती आढळले. दक्षिण मुंबई वगळता जवळपास सर्वच भागांतील झाडांमध्ये खिळ्यांची टोचणी जास्त दिसून आली.
  •  एकट्या आर-एन वॉर्डात ९३३ खिळे दिसून आले. टी वॉर्डात ९२९ खिळे पालिका अधिका-यांनी प्रर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने काढले. ७५२ खिळे एफ-एन वॉर्डातील झाडांतून काढले गेले. मुंबईभरातील झाडांतून १० हजार ३७९ खिळे काढले गेले.
  •  जीएस वॉर्डातील झाडांवर ८०० किलो कॅबलचा भार होता. तर ३.२ किलो खिळे मारले गेले होते.
  • एकट्या आर-एस वॉर्डात १५५ झाडांवर सिमेंटीकरणाचा थर होता. नजीकच्या आरए-एन वॉर्ड तसेच के-डब्ल्यू वॉर्डातही १५३ झाडांना सिमेंटीकरणातून मुक्ती मिळाली.
  •  जास्त फलकांच्या संख्येत १८६ केई वॉर्डाने बाजी मारली. त्याखालोखाल एल वॉर्डात जास्त फलके दिसून आली. १५६ फलक एम-डब्ल्यू वॉर्डात होते.

( हेही वाचा: कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आव्हान )

वृक्ष संजीवनी अभियानात सहभागी पर्यावरणप्रेमी संस्था आणि महाविद्यालये

आंघोळीची गोळी, पोदार कॉलेज, एकता मार्च, माइण्ड स्पेस एएलएम, विश्वकर्मा फाऊंडेशन, रीव्हर मार्च, एलएसीसी, आर्किटेक्टरल कॉलेज, टीएलआरडब्ल्यूए, रॉयल्टी क्लब एण्ड तीन बत्ती नाका मित्र मंडळ, हरियाली एनजीओ, उत्कर्ष,मुंबई मार्च, भगवान फाऊंडेशन, अखंड वृक्ष अखंड भारत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here