अखेर बारावीचीही परीक्षा रद्द! 

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या झालेल्या बैठकी हा निर्णय घेण्यात आला,

राज्यातल्या बारावीचीही परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती  मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

(हेही वाचा : १२वीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा २ आठवड्यांचा अल्टिमेटम! )

बुधवारी, २ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीनंतर यावर निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले होते. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असेही त्या म्हणाल्या. आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती, असेही वडेट्टीवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here