तलाठी भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेत Talathi Exam तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सोमवारी सकाळी मोठा गोंधळ झाला होता. याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले होते. अखेर पाच तासांनी सर्व्हर सुरळीत होऊन परीक्षा सुरु झाली.
तलाठी भरती परीक्षा-२०२३ सोमवारी (२१ ऑगस्ट) रोजी राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावरती आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र ९.०० ते ११.०० नियोजित करण्यात आले होते. मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
(हेही वाचा :Green Tea : दिवसाची सुरुवात ग्रीन टी पिऊन करणे योग्य आहे का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)
या सर्वांमुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती असल्याचे चित्र आहे. नागपूर, अमरावती, अकोला, लातूर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रशासना विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागले होते. तसेच परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. मात्र अखेर दुपारी दोन वाजता परीक्षा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे २ वाजता ही परीक्षा झाली. आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हेही पहा ;
Join Our WhatsApp Community