अर्थ मंत्रालयाच्या एका कर्मचा-याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पैशांच्या मोबदल्यात इतर देशांना गोपनीय माहिती पाठवत असल्याचे उघड झाले आहे. हा कर्मचारी पैशांच्या मोबदल्यात देशाच्या अर्थ मंत्रालयातील गोपनीय माहिती इतर देशांना पुरवत होता. सुमीत असे या कर्मचा-यांचे नाव आहे. दिल्ली पोलिसांनी या कर्मचा-याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत हा अर्थ मंत्रालयात कंत्राटी कर्मचारी आहे. पैशांच्या मोबदल्यात मंत्रालयातील गोपनीय माहिती इतर देशांना पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ती माहिती गोपनीय आणि संवेदनशील आहे. सुमितकडून पोलिसांनी एक फोन जप्त केला आहे. त्या फोनद्वारेच तो हेरगिरीची कामे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी ऑफिशियल सिक्रेट कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर )
बजेटशी संबंधित डेटा लीक?
अर्थसंकल्पापूर्वीच ही अटक झाल्यामुळे हेरगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जर बजेटशी संबंधित डेटा लीक झाला तर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community