- ऋजुता लुकतुके
एका सरकारी पत्रकामुळे बँकांच्या विलिनीकरणाचा गोंधळ काही काळ उडाला होता. (PSU Banks Merger)
युको बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक यांचं विलिनीकरण होणार नसल्याचं अखेर अर्थ मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केलंय. १४ डिसेंबरला अर्थ मंत्रायलाच्या एका पत्रकाने गोंधळ वाढवला होता. पुढील वर्षाच्या सुरुवातीला वरील चार बँकांचे प्रतिनिधी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांची एक बैठक लोकसभेनं नेमलेल्या एका समितीबरोबर प्रस्तावित आहे. या बैठकीची माहिती देताना अर्थ मंत्रालयाने काढलेल्या एका पत्रकात ‘विलिनीकरणानंतरच्या परिस्थितीत’ असे शब्द लिहिलेले होते. (PSU Banks Merger)
(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊदच्या वृत्ताने गुन्हेगारी विश्वात खळबळ, दाऊदचे मुंबईतील नातलग मात्र चिडीचूप)
या चर्चांना उधाण
त्यावरून बँकिंग क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली होती ती या बँकांच्या विलिनीकरणाची. ज्या २ आणि ६ जानेवारीच्या प्रस्तावित बैठकीबद्दल हे पत्रक होतं, ती बैठकही या चार बँकांच्या विलिनीकरणा संदर्भातच असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. ट्विटरवर बँकिंग क्षेत्रातील तज्ञ या पत्रकाचा स्क्रीनशॉट काढून शेअर करत होते. (PSU Banks Merger)
त्यामुळे रविवार असतानाही अर्थ मंत्रालयाला एक नवीन पत्रक काढावं लागलं. आता सुधारित पत्रकात २ जानेवारी आणि ६ जानेवारीला होणाऱ्या बैठकांसाठी या चार बँकांच्या प्रतिनिधी मंडळाला हजर रहायला सांगण्यात आलं आहे. आणि पुढे बैठकीचा उद्देशही स्पष्ट करण्यात आला आहे. (PSU Banks Merger)
(हेही वाचा – Nathan Lyon : कसोटीत ५०० बळी मिळवणारा आठवा गोलंदाज)
‘विलिनीकरणाच्या परिस्थितीत’ शब्द काढला
लोकसभेनं नेमलेली ही समिती दरवर्षीप्रमाणे महत्त्वाच्या बँका आणि विमा क्षेत्रातील कंपन्यांनाही भेटणार असल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक कायदा १९५१ मधील बदलांविषयी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची मतं जाणून घेण्याचा या समितीचा मानस आहे. हे स्पष्टीकरण देताना आधीचा ‘विलिनीकरणाच्या परिस्थितीत’ हा शब्द आता काढून टाकण्यात आला आहे. पण, तो नेमका अधिकृत पत्रकात आलाच कसा याचं स्पष्टीकरण अर्थातच अर्थ मंत्रालयाकडून आलेलं नाही. (PSU Banks Merger)
सध्या मात्र सरकारी बँकांच्या विलिनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते सांगत आहेत. (PSU Banks Merger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community