Kurla Bus Accident मधील ३ मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत

कुर्ला बस अपघातामध्ये एकूण नऊ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ४० नागरिक गंभीर जखमी झाले होते.

226
मागील ०९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला येथे बेस्ट बस गाडीच्या भीषण अपघातातील दूर्दैवी मृत्यू  पावलेल्या ९ नागरिकांपैकी ३   मृतांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाचे  महाव्यवस्थापक एस  वी आर श्रीनिवासन यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश गुरुवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरीत करण्यात आले.  प्रत्येकी २ लाख एवढ्या रक्कमेचे धनादेश प्रदान करण्यात आले असून उर्वरित धनादेशांचे प्रदान हे नातेवाईक कार्यालयात आल्यावर देण्यात येतील,असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले.
कुर्ला बस अपघातामध्ये एकूण नऊ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ४० नागरिक गंभीर जखमी झाले होते. हा अपघात ९ डिसेंबर रोजी झालेला असताना अडीच महिन्यांनी बेस्ट उपक्रमाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. अपघातातील ९ मृत व्यक्तींपैकी आफरीन अब्दुल सलीम शाह (१९), मो. इस्लाम मो.निजाम अन्सारी (४९), मेहताब शेख (२२) या तीन मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मंगळवारी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे एस  वी आर श्रीनिवास यांच्या हस्ते प्रत्येकी २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
या  मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची, त्यांच्या वारसदारांची रीतसर कायदेशीर माहिती बेस्टच्या विधी खात्याने घेतली आणि त्याची खातरजमा केल्यानंतरच ही आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळेच ही मदत देण्यास थोडा उशीर झाल्याचे बेस्टच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  या अपघाताला जबाबदार बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील बसचा चालक जबाबदार होता. बेस्ट उपक्रमाने सुद्धा बसगाडीमध्ये काही दोष नव्हता, असे स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.