
नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे शुक्रवारी सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे. (Nanded Accident)
(हेही वाचा – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष Yoon Suk-yeol यांना पदावरून हटवले)
अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या. (Nanded Accident)
(हेही वाचा – Muzaffarnagar मधील मुस्लिम कुटुंबातील १० जणांची हिंदू धर्मांत घरवापसी)
त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. (Nanded Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community